Sunday, December 16, 2018
Home > माझ्या लेखणीतून… > अर्धा पापड

अर्धा पापड

उपास असला की दहा प्रकार बनवायला कंटाळाच येतो. अगदी घरात आल्यावर जेव्हा थोड शांत बसावे म्हणाव, तेव्हाच संसाराच्या टोपा चमच्यात तांदूळा मसाल्यात डोक खुपसुन कसा चांगला स्वयंपाक करावा. असा विचार करता करता भाज्या चिराव्यात तसा सगळा त्राणनी त्याबरोबरच धुवून घेते. एकदाची पोटाची सोय करत नाही तोपर्यंत भूक लागली म्हणून आरडा ओरड घशाशी संपतच नाही.
मग सगळा स्वयंपाक दहा बोटांवर पेलुन, मी एकदाची जेवण वाढत बसते. कुणाला हवे नव्हे यांची जाणीव करत करत दिवस लोटून रात्रीच्या भुकेला वाट करत करत एक घास पोटात चालुन पोहचत नाही. तोपर्यंत अर्धा पापड दे ग अशी चिडवण्याच्या हेतुने आठवण करुन देतात, ती अर्ध्या पापडाची.
मग डोक्यात तो अर्धा पापड गरगर फिरतच बसतो रात्रभर. आपल्या आई बाबा बहीण भाऊ नातेवाईक यांनी कधी आपल्याला कुणी चिडववतात, असे का बोलले नाही. लग्नाच्या नंतर माहीत व्हावे आणि अर्धा पापड का चिडवतात हे explain ही करावे. so मी ऐकून ऐकून घेतलेही, सासु म्हणाली अग तुमच्या जातीत लग्नाला गेले की अर्धा पापडच वाढतात फक्त मग मीच उत्तर शोधून काढलेच, आई जेव्हा पापड चुलीत भाजायची तेव्हा भाजल्यावर फोल्ड करुन कीतीतरी पापडाचे कावळे बनवुन चुलीच्या वरती गरम रहावे, म्हणून रचुन ठेवायची. आणि तळतानाही फोल्ड किंवा ……… मधे तोडुन तळून घ्यायची.. असे करण्यामागे फक्त एकमेव उद्देश होता तो अख्खा पापड ताटात कसा एका कोपऱ्यात राहावा बस. असे शंभर वेळा त्यांच्या कानात उत्तर वजा केले. पण ऐकायतील तर ना. जाऊ द्या.

रोजच्या धावपळीत कसाबसा संसाराचा गाडा ओढत ओढत, आयुष्याची बैलगाडी आपली आपण चालवतच असतो. किती पाऊस ऊन थंंडी असो रोजच्या रोज मेहनत करणे चुकत नाही. शिक्षण देऊन मी जी घडली त्या अर्धा पापड समाजातच. एक काळ असा होता मला फक्त दोनच जाती माहीत होत्या एक कुणबी आणि दुसरी अदिवासी बस. कारण गावात तेवढयाच जाती होत्या. पण जस जशी शहराच्या दिशेने वळली तसे दिवस भर अठरा पगडी जाती, पोटजाती, धर्म, भाषा आणि अनेक प्रकाराच्या माणसाचा वावर घुटमळत असतोच सभोवताली.

जेव्हा रात्री जर अर्धा पापड चिडवल तर बरे वाटायला हवेच आता. कुठे विसर पडणाऱ्या विळख्यात न दिसणारी आपली गावे, माणसे, स्मृती. जेवायला बसतानाही डोळ्यात तरंगुन जाव्यात. बालपण ते तारुण्याचा प्रवासात सोबत असणारा विविध रंगी स्व जाती तत्वाचा तक्ता हृद्यात कायम फडफडत असावा. माझ्या जीवनाला जेव्हा दुसऱ्या जातीत एक नवी कलाटणी जरी मिळाली तरी जीवनपटलावर कधी न पुसल्या जाणाऱ्या आठवणी त्या अर्ध्या पापडाने भराभर कुरकुरीत व्हाव्यात.
मग कितीही स्वयंपाक करायचा असला तरी पापड तळने कधीच सोडत नाही आणि तेही अर्धा तुकडा करुनच तळायचे सर्वांना वाढुन आपणही खायचे.

मग आता तुम्हांला काय वाटते तुमच्यावर आहे. अर्धे पापड तळायचे की नाहीत. जे वाटते ते मी करतेच. अगदी अर्धा पापड चिडवल तरीसुद्धा.

– नेत्रा राऊत

बोईसर (बेटेगाव)

मोबाईल : 9765599559

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *