Sunday, December 16, 2018
Home > अजब - गजब > ‘दुसऱ्या जगात’ प्रवेश करण्याचा मार्ग

‘दुसऱ्या जगात’ प्रवेश करण्याचा मार्ग

चित्रपटांपासून ते किस्से आणि कथांमध्ये आपण दुसऱ्या जगांबाबत ऐकत आलेलो आहोत. पण कल्पनांच्या पलिककडे असलेल्या आपल्या जगातही अशा काही जागा आहेत, ज्यांना दुसऱ्या जगात जाण्याचा मार्ग म्हटले जाते. पण अद्याप याचे काही पुरावे मिळालेले नाही, पण तरीही त्याचे अस्तित्व मानले जाते. त्यामुळे त्या दारांची पुजा केली जाते.

हे आहेत 5 मार्ग …

सूर्यदेवाचा दरवाजा (बोलिविया)

बोलिवियामध्ये एक असे गेट आहे, ज्याला सूर्यदेवाचा दरवाजा समजले जाते. दरवर्षी लोक यासमोर येऊन पुजा करतात. याठिकाणी येणाऱ्या लोकांना अशी अपेक्षा असते की, कधीतरी त्यांच्या पुजेने आनंदी होऊन हे गेट सुरू होईल.

 

स्टल सेमेट्रीस (पेनसिल्व्हेनिया)

पेनिसिल्व्हेनियामध्ये स्टल सेमेट्री आहे. त्याला नरकाचे द्वार म्हणतात. अशी मान्यता आहे की, हे हे गेट उघडले की, भूत प्रेते यातून बाहेर यायचे आणि ते लोकांना त्रास द्यायचे. याबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. येथे आजही हडळी येऊन पुजा करतात ही अशीच एक अख्यायिका. हे दार उघडून भुतांनी पुन्हा पृथ्वीवर यावे यासाठी त्या पुडा करतात असे म्हटले जाते.

सुमेरियन गेट (Sumerian Gate):

हे गेट इराकचे लोक आणि त्यांच्या अख्यायिकांशी संबंधित आहे. त्याचे कारण म्हणजे ते असे मानतात की, त्यांच्या पूर्वजांकडे अशा शक्ती होत्या की, ते इतर जगांमध्ये ये जा करू शकतात. त्यांच्या शिलालेखांवरही तसा उल्लेख आहे. ज्या दारातून त्यांचे पूर्वज दुसऱ्या जगात जायचे ते दार अजूनही उपलब्ध असल्याचे लोक मानतात. पण आता समुद्रात खोलवर ते हरवले आहे, अनेकांना प्रयत्न करूनही ते शोधता आलेले नाही.

होया बाचो फॉरेस्ट (Hoia Baciu Forest) रोमानिया –

रोमानियामधील होया बाचो फॉरेस्टमध्ये रात्रीच्या वेळी अनेक वस्तू चमकत असतात. येथील लोकांच्या मते, अनेकदा येथून लोक गायबही होतात. एका अख्यायिकेनुसार एकदा या जंगलातून एक मुलगी गायब झाली होती. 5 वर्षे ती कुणालाही दिसली नाही. 5 वर्षांनी जेव्हा ती लोकांना दिसली तेव्हा सर्वांना धक्का बसला. कारण तिचे वय एका दिवसानेही वाढलेले नव्हते. एवढेच नाही, तर ती मुलगी आपण हरवलोच नव्हतो असे म्हणत होती. या जंगलाशी संबंधित अशा अनेक गूढ कथा आहे.

Houska Castle, चेक रिपब्लिक –

याठिकाणी एक असा खड्डा आहे, ज्याची खोली अद्याप मोजता आलेली नाही. असे म्हटले जाते की, हा खड्डा एवढा खोल आहे की तो थेट नरकापर्यंत जातो. एक अशी अख्यायिका सांगितली जाते की, 13व्या शतकात एका कैद्यासमोर अशी अट ठेवण्यात आली की, त्याची शिक्षा रद्द केली जाईल, पण त्यासाठी त्याला खड्डा किती खोल आहे ते पाहून यावे लागेल. त्याला दोरीला बांधून खाली उतरवण्यात आले. पण काही सेकंदातच त्याच्या ओरडण्याचा आवाज सुरू झाला. त्याला बाहेर काढले तर तो म्हातारा झालेला होता. खाली जाताच त्याचे वय 30 वर्षांनी वाढले असे तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *