Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > पालघर जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणी केंद्र

पालघर जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणी केंद्र

माणिक दराडे : राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. त्याऐवजी आता काही बँकांमध्ये कायमस्वरुपी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रात नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डत बदल करणे आदी करून दिली जात आहेत
आधार कार्डसाठी नोंदणी पूर्ण मोफत आहे. अर्ज घेण्यापासून हातांचे ठसे, आयरिस नोंदविणे, फोटो काढणे यासारख्या कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.

खालील तक्त्यामध्ये आपल्या विभागातील बँक आणि त्या बँकांमधील शाखेची यादी देत आहोत ज्यामध्ये आपण नवीन आधार कार्ड बनवून घेऊ शकता किंवा तुमच्या आधार कार्डमध्ये तुम्हाला आवश्यक असलेले बदल करून घेऊ शकता.

[table id=10 /]

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, गेल्या तीन महिन्यांचे वीज- पाणी- दूरध्वनी बिल यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तर गॅझेटेड ऑफिसर किंवा तहसीलदारांनी त्यांच्या लेटरहेडवर तुमचा फोटो लावून दिलेले प्रमाणपत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. खासदार / आमदार / गॅझेटेड अधिकारी / सरपंच / तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याच्या लेटरहेडवरील नाव, पत्ता व फोटो लावलेले पत्र पत्त्याचा पुरावा म्हणून वैध आहे. कुटुंबातील प्रत्येकाला अशाप्रकारे स्वतंत्र कागदपत्रे मिळू शकली नाही, तर कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या नावे अशी कागदपत्रे घ्यावी, स्वतःची नोंदणी करावी आणि नंतर कुटुंबातील इतर सदस्यांची नोंदणी करावी. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसलेल्या व्यक्तीही नोंदणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आधार कार्डसाठी अर्ज सादर करू शकतात.

नोंदणी प्रक्रिया

आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक अर्ज पूर्ण भरून नोंदणी केंद्रावर पूर्वनिश्चित वेळी किंवा इतर वेळी जाऊन जमा करावा. हा अर्ज http://uidai.gov.in/ या वेबसाइटवर किंवा नोंदणी केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. याचठिकाणी नोंदणी केंद्रांची यादीही मिळेल. सर्वसाधारणपणे ई-सेवा केंद्रात आधारची नोंदणी होऊ शकते. नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो, हाताचे ठसे, आयरिस यांची नोंद कम्प्युटरमध्ये करेल. तसेच तुमची माहितीही कम्प्युटरमध्ये नोंदविली जाईल. माहिती भरताना ती तपासून घ्या व आवश्यक दुरुस्त्या लगेच करून घ्या. सर्व अर्ज भरून झाल्यावर ही माहिती केंद्रीय सर्व्हरकडे पाठविली जाईल व त्याची पावती दिली जाईल. ही पावती सांभाळून ठेवणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण आयुष्यात आधार कार्डसाठी एकदाच नोंदणी करावी. वारंवार नोंदणी केली म्हणून नवीन कार्ड मिळणार नाही.

नोंदणीस्थिती जाणून घेणे

तुमचा आधार क्रमांक तयार करण्यापूर्वी तुमचा डेटा देशभरातील नोंदणी केलेल्या नागरिकांच्या डेटासोबत तपासून पाहिला जातो. त्यात पुनरावृत्ती नसल्याची खात्री केली जाते. संपूर्ण तपासणी झाल्यावरच तुमचा आधार क्रमांक तयार होतो व आधारसाठी नोंदणी केल्यावर तुम्ही नोंदविलेल्या पत्त्यावर आधार कार्ड मोफत घरपोच पाठविले जाते. साधारणतः महिनाभराने आधार कार्ड नाही आले तर https://resident.uidai.net.in/check-aadhaar-status या वेबसाइटवर किंवा नोंदणी केंद्रावर जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक, नोंदणीची वेळ व तारीख ही माहिती भरून तुम्हाला कार्डची सद्यस्थिती कळू शकेल. तसेच कार्ड तयार झाले असल्यास तुम्हाला आधार क्रमांक व ई-आधार कार्ड मिळते. समजा तुम्ही आधार कार्डसाठी दिलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊन तुम्हाला पुन्हा नोंदणी करण्याचे पत्र पाठविले जाते. त्यानंतर पुन्हा नोंदणी करावी.

माहिती अपडेट कशी कराल?

आधार कार्ड मिळाल्यानंतर काहींचे पत्ते बदलतात, मोबाइल क्रमांक बदलतात, लग्नानंतर नाव बदलते. अशा वेळी नव्याने आधार कार्ड काढण्याची गरज नाही. किंबहुना नव्याने काढण्याचा प्रयत्न केला तरी आधार कार्ड मिळणार नाही. त्याऐवजी जुन्या आधार कार्डमधील माहितीमध्ये सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी https://resident.uidai.net.in/update-data या वेबसाइटला भेट द्या. त्याठिकाणी तुमचा आधार क्रमांक नमूद करा. त्यानंतर आधार नोंदणीच्या वेळी तुम्ही नोंदविलेल्या मोबाइलवर एक पासवर्ड पाठविला जाईल. तो पासवर्ड वेबसाइटवर नमूद करा. त्यानंतर कोणती माहिती बदलायची आहे ती निवडा. नव्याने तुमची माहिती भरा व सोबत पुराव्यासाठी कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करा. वर दिलेल्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्या माहितीतील बदलाची स्थिती तपासून पाहू शकतात. वेबसाइटद्वारे अपडेट करायची इच्छा नसणाऱ्या व्यक्ती पोस्टाद्वारे अर्ज पाठवूनही माहितीमध्ये बदल करू शकतात. त्यासाठीचा अर्ज वर नमूद केलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह आधारच्या बेंगळुरू येथील पत्त्यावर पाठवून दिला तरी तुमच्या माहितीमध्ये बदल करता येतो.

तक्रारीसाठी संपर्क

टोल फ्री क्रमांक – १८००३००१९४७
फॅक्स ०८०-२३५३१९४७
पत्रव्यवहाराचा पत्ता- PO Box 1947, GPO Bangalore – 560001
इमेल- help@uidai.gov.in

One thought on “पालघर जिल्ह्यातील आधार कार्ड नोंदणी केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *