Sunday, December 16, 2018
Home > अपघात - Accident > विरारच्या गिर्यारोहकाचा उत्तरकाशीमध्ये बर्फात गोठून निधन

विरारच्या गिर्यारोहकाचा उत्तरकाशीमध्ये बर्फात गोठून निधन

मंगळवार १० एप्रिल रोजी उत्तरकाशी येथे विरारचा गिर्यारोहक सुमित कावली याचे बर्फात गोठून निधन झाले. त्याचे पार्थिव आज आगाशी येथील त्याच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती अशी की, मिरारोड येथे राहणारा व पुण्याच्या एका खाजगी कंपनीत कामाला असणारा गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी सुमित कावली याने मुंबईच्या युथ हॉस्टेल्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उत्तरकाशी येथील चेन्सील बग्यल मेडो या ट्रेकसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. ८ फेब्रुवारी रोजी ४० गिर्यारोहकांचा गट चेन्सील बग्यल मेडो येथे पोहोचला. त्यांचे पहिले शिबीर समुद्रसपाटीपासून १०,४०० फूट उंचीवर असणारे सुनाती थाच हे होते. सुनाती थाच यशस्वीरीत्या सर केल्यानंतर ते बेस कॅम्पकडे परतले. त्यांचा दुसरा टप्पा होता समता थाच. परंतु समता थाच चढतांना अचानक हवामान खराब झाले आणि त्यामध्ये त्यांचा गट वेगळा झाला. आपल्या गटापासून सुमित भरकटला त्यानंतर मंगळवारी त्याचा मृतदेह आढळून आला.

सुमितने याआधीही अनेक ट्रेकमध्ये सहभागी झाला होता. परंतु उत्तरकाशी मधील ट्रेक त्याच्या आयुष्यातील शेवटचा ट्रेक ठरला. सुमितचे वडील आणि लहान भाऊ विरार पश्चिम येथील आगाशी येथे राहतात. त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आज आगाशी येथ आणण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *