Home > इथेही लक्ष द्या

पालघर आणि बोईसरला चांगले सरकारी हॉस्पिटल का नाही ?

पालघर जिल्हा घोषित होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये ४ वर्षे पूर्ण होत आहेत. २,९९०,११६ एवढी लोकसंख्या असतानाही एकही बर्न आणि कॅन्सर हॉस्पिटल नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर हि बाब प्राकर्षाने जाणवली. याबाबत सोशल मिडीयावर काही जागरूक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. त्यातील काही प्रतिक्रिया खाली देत आहोत. ह्या प्रतिक्रियेनंतर तरी प्रशासन

अधिक वाचा...

पनवेल – डहाणू मेमू गाडीत मराठी भाषेतील सूचनेचा रकाना रिकामाच !

पनवेल-डहाणू मेमू गाडीत (डबा क्र. 20062) सूचना फलकांवर स्थानिक भाषेतील सूचनेसाठी रिकामी जागा सोडली आहे. हिंदी-इंग्रजीत सूचना छापल्या आहेत. कित्येक वर्षे या गाड्या वापरात असूनही मराठीत सूचना का नाहीत? कृपया मराठीत सूचना लिहाव्यात. - मंदार मोडक

अधिक वाचा...

साखरगाठी कारखान्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी

आम्ही आमच्या कुटुंबासोबत परळी नाका येथे राहत आहोत. आमच्या घराला लागून असलेली श्री प्रकाश महाजन यांच्या जागेत होळीसाठी लागणारे साखरगाठी बनवण्याचा कारखाना गेल्या काही दिवसांपासून तात्पुरता तंबूमध्ये सुरू करण्यात आला आहे. या कारखान्यातून निघणारे घाण पाणी कोणतीही व्यवस्था न करता बाहेर तसेच सोडून दिल्याने त्या पाण्याचा अतिशय घाण व कुजलेला

अधिक वाचा...

कशिवळी घाटात रस्त्यालगत संरक्षण भिंत असावी

जव्हार तालुक्यात कशिवळी घाटात धोकादायक वळणावर रस्त्यांलगत संरक्षण भिंत नसल्याने मोठी दुर्घटना होवु शकते कारण रस्ता ढासळण्याच्या अवस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष पहाणी करून उपाययोजना करावी आणि पुढे होणारी मोठी दुर्घटना टाळावी:- - अनंता वनगा अध्यक्ष - आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना

अधिक वाचा...

नायगावमध्ये घाणीच्या पाण्यावर पालेभाज्यांची लागवड

नायगाव पश्चिमेला ईसार जिमच्या मागे घाणीच्या पाण्यावर पालेभाज्यांची लागवड केली जात आहे. कोणी लोकप्रतिनिधी / प्रशासन ह्याकडे लक्ष देईल का??? - विपुल पवार वसई लोकल फेसबुक पेजवरून

अधिक वाचा...

धोकादायक ट्रांसफॉर्मर

वसई पूर्व येथील आनंदनगरमधील जय गणेशकृपा सोसायटीजवळील धोकादायक ट्रान्सफॉर्मरबाबत वेळोवेळी तक्रार करूनही अद्याप काहीही कारवाई करण्यात आली नाही. सादर ट्रान्सफॉर्मरला कोणतेही सुरक्षा कवच नसून काही वर्षे अगोदर या ट्रान्सफॉर्मरला झालेल्या स्फोटामध्ये एका मुलाचा जीव गेला होता आणि दोन जण जखमी झाले होते. या ट्रान्सफॉर्मला सुरक्षा कवच नसल्यामुळे  येथील लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. या ट्रान्सफॉर्मरला संरक्षण

अधिक वाचा...

फुटलेल्या पाइपलाइनकडे दुर्लक्ष

नायगाव पूर्वेकडील भागामध्ये चंद्रपाडा गावात शांती गोविंद विद्यालयासमोर पाण्याची पाइपलाइन गेल्या तीन महिन्यांपासून फुटली आहे. याची दुरुस्ती न केल्यामुळे येथे सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे येथे रोगराई पसरण्याची भीती आहे. या पाइपलाइनची त्वरित दुरुस्ती करावी. - जयेश म्हात्रे

अधिक वाचा...

फूटपाथवर अतिक्रमण

पश्चिमेकडील विशाल नगर येथील फूटपाथवर असे अवैधपणे व्यवसाय केले जात आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासही जागा शिल्लक रहात नाही. या फेरीवाल्यांना हटवून फूटपाथ मोकळा करावा.- नितीश म्हात्रे

अधिक वाचा...

दरवाजा बंद

विरार : स्थानकात पूर्वेकडे गर्दीच्या वेळी तिकीट खिडकीकडे जाणारा एकच दरवाजा उघडा असतो. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. एकाच दरवाजातून ये-जा करावी लागते. तेव्हा हा दरवाजाही खुला करावा. - रोहन कदम

अधिक वाचा...

फूटपाथवरील अडथळा दूर करा

विरार : मानवेलपाडा येथे फूटपाथवरील गटाराचे झाकण नीट बसवलेले नाही. तसेच, त्यावर आणखी एक झाकण ठेवण्यात आलेले आहे. हे झाकण नीट दुरुस्त करावे आणि हे अतिरिक्त झाकण हटवावे. - रोहन कदम

अधिक वाचा...