Sunday, December 16, 2018
Home > गुन्हे - Crime > आई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या ? आज माणगाव बंद

आई बिनविरोध निवडून आली म्हणून ८ वर्षीय दियाची हत्या ? आज माणगाव बंद

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्‍यातील वावे गावातील अपहरण झालेल्‍या दिया जाईलकर या ८ वर्षीय मुलीची हत्‍या झाली असल्‍याची धक्‍कादायकबाब समोर आली आहे. या हत्येच्या निषेधार्ध आज माणगाव तालुक्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय. आई निवडणुकीत बिनविरोध निवडून आली म्हणून दियाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून माणगाव पोलीस त्यादृष्टीनेही तपास करत आहेत.

२५ मे रोजीच गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली. त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. वरिष्‍ठ पोलीस अधिकारी घटनास्‍थळी पोहोचले आहेत. दियाचा मृतदेह माणगाव सरकारी रूग्‍णालयात आणण्‍यात आला तेव्‍हा तेथे ग्रामस्‍थांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशिरा दिया मृतदेह उत्‍तरीय तपासणीसाठी मुंबईत नेण्‍यात आला आहे.

गोरेगाव, माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावातल्या बाजारपेठा आज बंद राहणार आहेत. दियाचा मृतदेह तिच्‍या घरापासून जवळच असलेल्‍या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला होता. २५ मे रोजी सायंकाळपासून दिया बेपत्‍ता होती. गावातील दुकानात खाऊ आणण्‍यासाठी गेलेली दिया परतलीच नाही. तिच्‍या नातेवाईकांनी शोध घेवून ती सापडली नाही. त्‍यामुळे माणगाव पोलीस ठाण्‍यात अपहरणाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *