Sunday, December 16, 2018
Home > मुंबई > काळाचौकी येथे गोदामाला आग

काळाचौकी येथे गोदामाला आग

मुंबईतील काळाचौकी परिसरात दत्ताराम लाड मार्गावर असलेल्या इस्टल मेटल कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

ही आग मोठी असून आजू बाजूचा परिसर हा दाट लोकवस्तीचा आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून अग्निशामक दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी ८ फायर इंजिन आणि ६ वॉटर टँकर दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *