Sunday, December 16, 2018
Home > अपघात - Accident > मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर-लक्झरी बसचा अपघात, २ ठार तर ४ जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर-लक्झरी बसचा अपघात, २ ठार तर ४ जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ कंटेनर आणि लक्झरी बसमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर कासा उपजिल्ह्या रुग्णलयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले आहे. मृतांमध्ये बसचा क्लिनर व बसमधील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी जवळ लक्झरी बसचे पुढील चाक पंक्चर झाले म्हणून बस ड्रायव्हरने बस महामार्गावरील पहिल्या लाईनवर केली. क्लिनर पंक्चर चाक बदली करण्याचे काम करत असतानाच मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने बसला धडक दिली. या अपघातात बसचा क्लिनर आणि बसमधील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला व कंटेनरचालकासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.

[masterslider id=”5″]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *