Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > रेल्वे प्रशासनाचे एक पाऊल मागे, अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेणार

रेल्वे प्रशासनाचे एक पाऊल मागे, अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेणार

ऐन गर्दीच्यावेळी रेल्वेच्या अॅप्रेंटीस विद्यार्थ्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनानं रेल्वे प्रशासनाला एक पाऊल मागे घेण्यास भाग पाडलं. रेल्वेच्या प्रशासनानं प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्याचं जाहीर केले. या परीक्षेसाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत फॉर्म भरता येतील. प्रशिक्षणार्थी (अॅप्रेंटीस) विद्यार्थ्यांना रेल्वे सेवेत सामावून घेतलं जात नव्हतं म्हणून नाराज विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन अखेर यशस्वी झालं.

आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

रेल्वे भरती परीक्षेतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेवरील दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान ‘रेल रोको’ केल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पाठिंबा दिल्यानं आंदोलन आणखी तीव्र झालंय. पण त्याचा फटका सामान्य मुंबईकरांना, लाखो नोकरदारांना, महिला प्रवाशांना बसला आहे.

रेल्वे भरती परीक्षा गोंधळाविरोधात रेल्वे अॅप्रेंटिस आक्रमक, मध्य रेल्वे ठप्प

One thought on “रेल्वे प्रशासनाचे एक पाऊल मागे, अॅप्रेंटीसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *