Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > ‘लेडीज स्पेशल’ला झाली २६ वर्ष पूर्ण

‘लेडीज स्पेशल’ला झाली २६ वर्ष पूर्ण

विरार स्टेशन मास्टर, आरपीएफ, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवासी संघटनेने केली जनजागृती

पश्चिम रेल्वेच्या गौरवशाली इतिहासामध्ये ‘लेडीज स्पेशल’ लोकलला आज २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. ५ मे १९९२ ला पहिली लेडीज स्पेशल चर्चगेट ते बोरीवली स्थानकादरम्यान धावण्यात आली. जगामध्ये पहिल्यांदाच महिला प्रवाशांसाठी ‘लेडीज स्पेशल’ लोकल सुरु करण्याचा मान पश्चिम रेल्वेला मिळाला आहे.

मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे वरील महिला स्पेशल लोकल ला आज २६ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पश्चिम रेल्वेकडून महिलांना शुभेच्छा देणारे ध्वनीप्रेक्षेपण करण्यात येत होते. तसेच  महिला टीसी कडून महिला प्रवाशांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्याचबरोबर महिला हेल्पलाईन नं. १८२ बद्दलही जनजागृती करण्यात येत होती.

पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांना लक्षात घेऊन ५ मे १९९२ ला पहिली आणि एकमात्र ‘लेडीज स्पेशल’ लोकल चर्चगेट ते बोरीवली दरम्यान धावण्यात आली. आज पश्चिम रेल्वेवर ८ लेडीज स्पेशल लोकल धावत आहेत ज्या सकाळी ४ (०७.३५ : विरार – चर्चगेट, ०७.४१ : बोरीवली – चर्चगेट, ०९.०६ : भाईंदर – चर्चगेट आणि ०९.५६ : वसई – चर्चगेट) तर सायंकाळी ४ (०५.३९ : चर्चगेट – बोरीवली, ०६.१३ : चर्चगेट – विरार, ०६.५१ : चर्चगेट – भाईंदर आणि ०७.४० चर्चगेट – विरार) अशा चालविण्यात येत आहेत.

महिलांच्या सुरक्षितेसाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्यात येतात ज्यामध्ये महिलांच्या जवळपास ६० डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच काही डब्यांमध्ये टॉक बँक सिस्टम बसविण्यात आली आहे जेणेकरून आपात्कालीन स्थितीमध्ये महिला प्रवाशी थेट रेल्वे बोर्डला संपर्क शकतात.

– रवींद्र भास्कर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

यावेळी विरार स्टेशन मास्टर प्रधान, विरार RPF चे मॉल, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १८२ क्रमांकाचे महत्त्व सांगून जनजागृती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *