Home > गुन्हे - Crime > भाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार

भाजपा नालासोपारा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग तडीपार

नालासोपाराच्या भाजपा चा युवा मोर्चा अध्यक्ष अरुण सिंग याला खंडणी वसुलीसह नऊ आरोपांखाली दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. अरुण सिंग माहिती अधिकाराखाली बिल्डरांची माहिती काढून त्यांच्याकडून खंडणी घेतल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली होती. २००९ पासून सिंग वर नऊ आरोप नोंदविण्यात आले आहे.

माहितीनुसार, नालासोपारा शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अरुण सिंग, २००९ पासून २०१८ पर्यंत खंडणी, प्राणघातक हल्ला आणि फसवणूक प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात एक, नालासोपारा पोलीस ठाण्यात चार,  तुळींज पोलिस ठाण्यात तीन तर वालीव पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस त्याच्या गुन्हेगारी प्रकरणे वसई विभाग प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर यांना पाठविले, त्यानंतर प्रांत अधिकारी त्याला पालघर, रायगड, ठाणे आणि मुंबई मधून दोन वर्षे तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

अरुण सिंग पक्षाच्या नावाच्या आधारे स्थानिक बांधकाम व्यावसायिक यांच्या  विरुद्ध माहिती अधिकार मार्फत माहिती मागवून संबंधित व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागत असे. गेल्या महिन्यात त्याला याप्रकरणी अटकही करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *