Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > पालघर पोटनिवडणुकीत रंगणार चौरंगी सामना

पालघर पोटनिवडणुकीत रंगणार चौरंगी सामना

 

शरद वारुंगशे पाटील : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर शिवसेनेनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे भाजपाने काँग्रेसचे नाराज नेते राजेंद्र गावित यांना गळाला लावून वनगा विरोधात उभे केले आहे. त्यामुळे तब्बल तीन दशकानंतर शिवसेना V/S भाजपा असा सामना पालघरवासियांना पहायला मिळणार आहे.

हे सर्व सुरु असताना राष्ट्रवादीने हि आपले नशीब आजामावायाचे ठरविले असून त्यांनी दामोदर (दामू) सिंगाडा यांना रिंगणात उतरविले आहे. पण या सर्वांमध्ये गेमचेंजर ठरणार आहे टी बहुजन विकास आघाडी (बविआ). बविआची वसई विरार महानगरपालिकेमध्ये सत्ता असून वनगा यांनी बविआच्या बळीराम जाधव यांचा पराभव केला होता. बविआ जाधव यांना पूर्ण ताकदीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरविणार असून गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि त्यासाठी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना कामालाही लावले आहे. दरम्यान बविआ उद्या आपला अधिकृत उमेदवार जाहीर करून उद्याच अर्जही भरणार असल्याचे सांगण्यात येते. पालघरची जनता कुणाला कौल देणार? ते ३१ मे रोजी कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *