Sunday, December 16, 2018
Home > ठळक बातम्या > नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

नरेंद्र – देवेंद्र नंतर पालघरमध्ये राजेंद्र

शरद वारुंगशे पाटील : आरोप प्रत्यारोपामध्ये झालेल्या पालघर निवडणुकीमध्ये भाजपाने आपला पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी दिवंगत चिंतामण वनगा यांचा मुलगा आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा ४४ हजार ५८९ मतांनी पराभव केला. त्यामुळे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र तर पालघरमध्ये राजेंद्र असे बोलले जात आहे.

भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित २ लाख ६९ हजार ८०२ मते मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४१ हजार १९१ मते मिळाली. बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना २ लाख १९ हजार ८७२ मते मिळून ते तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. तर कॉंग्रेसच्या शिंगाडा यांना अवघे ७१ हजार १९४ मते मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *