Home > इतर बातम्या > बिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील ९३% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

बिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील ९३% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

वृत्तसंस्था : जगभरात बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, जगभरात ९० टक्के बाटलीबंद पाण्यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आढळून आले आहेत. यात जगातील ९ देशांतील ११ मोठ्या ब्रँडस् समावेश आहे. यात भारतातील ब्रिस्लरी, अॅक्वाफिना आणि ईव्हियनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.

न्यूयॉर्कच्या स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी या ब्रँडस्च्या २७ लॉटमधून २५९ बाटल्यांची चाचणी घेतली. यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबईसह जगातील १९ शहरांतील नमुने गोळा करण्यात आले होते. चाचणीदरम्यान १ लिटर पाण्याच्या बाटलीत १०.४ मायक्रोप्लॅस्टिक अवशेष मिळाले. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे.

भारतासह ९ देशांतून नमुने

अहवालानुसार, या चाचणीसाठी भारतासह ९ देशांतून बाटलीबंद पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. यात भारताव्यतिरिक्त अमेरिका, चीन, ब्राझील, इंडोनेशिया, केनिया, लेबनॉन, मॅक्सिको आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. यादरम्यान भारतातील ९३ टक्के नमुन्यांत प्लॅस्टिकचे अंश सापडले. ज्या नमुन्यांत प्लॅस्टिकचा अंश सापडला त्यात भारतातील बिस्लरी आणि अॅक्वाफिना, अॅक्वा, दसानी, एव्हियन, नेस्ले प्युअर लाइफ आणि सान पेलेग्रिनोसारख्या ब्रँडस् चा समावेश आहे.

One thought on “बिस्लरी, अॅक्वाफिनासह जगातील ९३% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *