Sunday, December 16, 2018
Home > इथेही लक्ष द्या > साखरगाठी कारखान्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी

साखरगाठी कारखान्यामुळे परिसरात उग्र दुर्गंधी

आम्ही आमच्या कुटुंबासोबत परळी नाका येथे राहत आहोत. आमच्या घराला लागून असलेली श्री प्रकाश महाजन यांच्या जागेत होळीसाठी लागणारे साखरगाठी बनवण्याचा कारखाना गेल्या काही दिवसांपासून तात्पुरता तंबूमध्ये सुरू करण्यात आला आहे. या कारखान्यातून निघणारे घाण पाणी कोणतीही व्यवस्था न करता बाहेर तसेच सोडून दिल्याने त्या पाण्याचा अतिशय घाण व कुजलेला उग्र वास आमच्या घरात शिरत आहे त्यामुळे आम्हाला सर्व स्थानिक रहिवाशांना अतिशय त्रास होत असून आम्ही आमच्या घरात जेवण सुद्धा करू शकत नाही इतकी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच त्यांच्या घाण पाण्यावर माश्या व मच्छर यांचे प्रमाण वाढल्याने आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या आम्ही गेली अनेक वर्षे सहन करत असून होळीनंतर देखील महिनाभर हा उग्र वास जाणवत असतो. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तात्काळ दखल घेऊन परवानगी देतानाच या कारखान्यातून निघणाऱ्या घाणपाण्याची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देऊन आवश्यक कारवाई करावी ही विनंती.

– वैभव भानुशाली
वाडा परळीनाका

[masterslider id=”2″]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *