Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > १ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पालघरमधून होणार सुरुवात

१ मे पासून राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, पालघरमधून होणार सुरुवात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे १ मे पासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात करणार आहेत, ते आपल्या दौऱ्याची सुरुवात पालघरमधून करणार आहेत.

१ मे हा महाराष्ट्र दिन आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, म्हणून १ मे या दिवशीच, राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत.

पालघरचे माजी खासदार दिवंगत चिंतामण  वनगा यांच्या निधनानंतर पालघरची लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची चिन्हे असताना राज ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात पालघर मधून होणार असल्यामुळे राजकीय विश्लेषकांचे भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांचा हा दौरा आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय मंडळींना पडला आहे.

मनसेने मागील काही महिन्यांपासून शहरी आणि ग्रामीण सर्वच विषयांवर हात घातला आहे. मग परप्रांतीयांचा मुद्दा असो वा दुकानावरील गुजराती फलकांचा विरोध. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामाबाबतही मनसे सक्रीय झाल्याचे काही दिवसात दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *