Sunday, December 16, 2018
Home > अपघात - Accident > शार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी

शार्दुल ठाकूरचे आई-वडील बाईक अपघातात जखमी

शरद वारुंगशे पाटील : पालघरचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूरच्या आई-वडिलांचा काल संध्याकाळी लग्नावरून परतताना बाईकवरून अपघात झाला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना पालघरच्या ढवले रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी की, शार्दुलचे वडील नरेंद्र ठाकूर आणि आई हंसा ठाकूर हे काल एका लग्नासाठी पालघर येथील अल्याळी येथे आले होते. संध्याकाळी घरी परतताना त्याचे बाईकवरील नियंत्रण रस्त्याच्या कडेला त्यांची बाईक घसरली. बाईक वेगात असल्याने या दोघांनाही गंभीर इजा झाली. स्थानिक पोलिसांनी त्यांना येथील खाजगी ढवले रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *