Sunday, December 16, 2018
Home > गुन्हे - Crime > भिवंडीत शिवसेना संघटकाची निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवला

भिवंडीत शिवसेना संघटकाची निर्घृण हत्या करून मृतदेह पेटवला

अहमदनगरमध्ये दोन शिवसैनिकांच्या हत्येची घटना ताजी असतानाच, भिवंडी तालुक्यात शिवसेनेचे भिवंडीचे संघटक शैलेश निमसे (४५ वर्षे) यांची निर्घृण हत्या करून त्यांना जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शैलेश निमसे हे शहापूरचे शिवसेना तालुका उपप्रमुख तसेच संघटक होते. भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे, निमसेंच्या हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला.

निमसे यांचा मृतदेह भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आला आहे. हत्येचं कारण वैयक्तिक आहे की राजकीय हे अद्याप कळू शकलेलं नाही. तसेच, मारेकरी कोण, याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यात दोन शिवसैनिकांची राजकीय वादातून हत्या झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच भिवंडीत शिवसैनिकांच्या हत्येचं प्रकरण समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *