Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > पालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

पालघरच्या कृतिकाचे कोकण विभागीय जलतरण स्पर्धेत घवघवीत यश

जितू घरत : कै. श्री. वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ, समन्वय प्रतिष्ठान ठाणे व ठाणे जिल्हा जलतरण संघटना आयोजित, मारोतराव शिंदे तरण तलाव, ठाणे (प) येथे झालेल्या “कोकण विभागीय जलतरण स्पर्धा – २०१८” या स्पर्धेत पालघरच्या  कृत्तिका नंदन वर्तकने कोकण विभागामधून घवघवीत यश संपादित केले.

तिने १०० मी. Butterfly, १०० मी. Backstrock आणि २०० मी. Individual Medley (IM) मध्ये प्रत्येकी एक – एक सुवर्ण पदकाची कमाई करत १०० मी. Breast Stroke मध्ये रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत कृत्तिकाने ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवून, तसेच वैयक्तिक १८ गुणांची आघाडी घेऊन “Individual Championship Trophy (Girls Group 1)” चा मान पालघर जिल्ह्यास मिळवून दिला.

कृतिकाच्या या भरघोस यशास ‘वसई पालघर अपडेट’ आणि वाचकांतर्फे खूप खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *