Home > अजब - गजब > कसे काम करतो truecaller

कसे काम करतो truecaller

आजच्या घडीला बहुतेक सर्वजण स्मार्ट फोन वापरतो. त्यामधील विविध App आपण खूपवेळा हाताळत असतो आणि त्या सर्व App मध्ये एक असा App वापरतो जो एक वरदान म्हणूनच आपल्याला लाभला आहे. तो App म्हणजे truecaller.

Truecaller कसं काम करतो याची उत्सुकता सर्वांनाच असते तर मग चला जाणून घेऊया truecaller बद्दल true गोष्टी आणि ते काम तरी कसं करतं.

truecaller हा मोबाईल वापर्कार्त्यांमधील नं. १ वर असणारा App आहे. याची निर्मिती स्वीडिश कंपनी True Software Scandinavia AB च्या Alan Mamedi आणि Nami Zarringhalam यांनी २००९ मध्ये केली. सर्वप्रथम हा App फक्त BlackBerry मोबाईलमध्ये १ जुलै २००९ रोजी वापरण्यात आला. याला आलेल्या चांगल्या परिणामामुळे पुढे Symbian and Microsoft Windows Mobile सारख्या हायटेक फोनमध्ये याचा वापर करण्यात आला. त्यानंतर पुढे truecaller ने थांबण्याच नावच घेतलं नाही. truecaller Android आणि Apple iPhone सोबत जवळ जवळ सर्वच मोबाईल कंपन्यांच्या OS मध्ये काम करू लागलं. truecaller तुम्हाला ९९.९% अचूक परिणाम दाखवतो.
truecaller मुळे जो नंबर तुमच्या फोन मध्ये सेव्ह नाही तो नंबरही नावानिशी अचूक दाखवतो, त्यासोबतच कोणते नंबर spam आहेत तसेच कोणते नंबर block list मध्ये आहेत, त्या नंबर वर किती वेळा कॉल करण्यात आलेला आहे इथपर्यंत सर्व माहिती आपल्याला पुरविली जाते. त्याबरोबरच जर तुम्ही तुमचा नंबर truecaller च्या Account मध्ये रजिस्टर केला नसेल तरीही तुमचे अचूक नाव दाखविले जाते तसेच जो नंबर तुम्हाला block मध्ये टाकायचा आहे तो नंबर block मध्ये टाकून इतरांनाही तो नंबर block नंबर आहे हे दाखवतो तेही कोणताही मोबदला न घेता, पण हे सर्व होतं कसं???

truecaller Sync म्हणजेच Synchronization (समक्रमण) तत्त्वावर काम करतो, म्हणजेच truecaller चे एक स्वतःचे सर्व्हर आहे त्या सर्व्हरमध्ये तो आपल्या मोबाईलमध्ये जेवढेही सेव्ह नंबर आहेत त्याची चोरी करतो (चोरी करतो म्हणजेच तशी चोरी करण्याचा आपण त्याला अधिकारच दिलेला असतो. म्हणजेच आपल जेव्हा हा App Install करतो तेव्हा तो फोनबुक हाताळण्यासाठी अधिकार मागतो आणि आपण तसा अधिकार देतोसुद्धा).

आता Truecaller फोनबुकमधील नंबर कसे हाताळते याबद्दल जाणून घेऊया –

जर समजा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या एखाद्या मित्राच्या फोनबुकमध्ये सेव्ह आहे आणि त्या तुमच्या मित्राच्या फोनमध्ये Truecaller install आहे तर Truecaller त्या तुमच्या मित्राचे सर्व फोन नंबर स्वतःकडील सर्व्हरवर uplod करतो. येथूनच Truecaller चं काम सुरु होतं. आता जो कोणीही Truecaller वर कोणाचाही नंबर शोधेल तेव्हा त्याला सर्व्हरवर तो नंबर ज्या नावाने सेव्ह असेल ते नाव दिसेल आणि जर असा कोणता नंबर सेव्ह नसेल तर त्याचा कोणताही परिणाम दाखवणार नाही. ह्यामध्ये एक गोष्ट नक्की ती म्हणजे Truecaller स्वतः स्वतःचे डेटाबेस तयार करत नाही तर तो तुमच्या फोनबुक मधील नंबर access करून ते स्वतःकडील सर्व्हरवर अपलोड करतो आणि त्यामधील मोबाईल नंबर आणि नाव आपल्याला दाखवतो.

म्हणजेच Truecaller आपल्या फोनबुकमधील नंबरला access करून सर्व्हरवर store करतो ज्याआधारे आपल्या फोनबुकमधील ज्या नावाचा नंबर आहे तो नंबर सर्व्हरमध्ये सेव्ह होतो आणि जेव्हा आपण कुणाचा नंबर Truecaller मध्ये शोधतो तेव्हा काही सेकंदातच तो आपल्याला त्या नंबरच नाव दाखवतो. पण ह्यामध्ये एक महत्त्वाचे म्हणजे Truecaller मध्ये एखादा नंबर ज्या नावाने सर्वात जास्त वेळा सेव्ह झाला आहे तेच नाव Truecaller दाखवेल.

आजच्या घडीला जगभरात Truecaller चे २५० दशलक्ष वापरकर्ते आहेत.

तर मग आता जास्त डोकं खाजवू नका कि Truecaller ला कसं माहित पडलं कि माझा नंबर हा माझ्याच नावाने आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *