Home > ठळक बातम्या > वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात

वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात

वनगा कुटुंबीयांच्या अश्रुंना न्याय देण्यासाठी मी आज या निवडणूक मैदानात प्रचारासाठी दाखल झालोय, भाजपनं श्रीनिवास वनगांना उमेदवारी दिली असती तर आज मी भाजपचा प्रचार करण्यासाठी इथे आलो असतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या जाहीर भाषणात मतदारांना भावनिक साद घातलीय.

त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, मुख्यमंत्री इथे येऊन कुत्रा मांजर म्हणाले, कुणाला म्हणाले माहित नाही. ते त्यांना उत्तर देतील, मात्र एक खरे कि कुत्रा मांजरेही कपाळाला हात मारत असतील. मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले, मग त्यांनी श्रीनिवास वनगा यांना का सांगितले नाही, मुख्यमंत्री म्हणतात आमच्या मनात होते मग तुम्ही मोदींसारखे रेडिओवर का नाही बोलत.

श्रीनिवास वनगा यांच्या उमेदवारीवर ते म्हणाले की, वनगा कुटुंबाला विचारा आम्ही त्यांना काही लालूच दिले का. तो परिवार माझ्याकडे आला आणि आम्ही त्यांचे अश्रू पहिले, आम्ही अश्रूंची किंमत केली. तुम्ही त्यांना काय दिले त्यांनी कधी स्वतःकडे पहिले नाही, ३५/४० वर्ष वनगा यांनी केवळ भगवा हातात धरला मात्र तुम्ही त्यांना त्यांच्या परिवाराला काहीच दिले नाही, तुम्ही वनगाच्या दुःखद निधनांनंतर त्यांना वाऱ्यावर सोडले ते बिचारे रडले तरी तुम्ही दाखल घेतली नाही. माझ्यावर मा चे संस्कार आहेत, मातोश्रीचे दरवाजे वनगा यांच्यासाठी कधीच बंद होणार नाहीत. यांच्याकडे उमेदवार नाही, माणसे नाही, उत्तर प्रदेश मधून माणसे आणतात, एका आदिवासी मुलाला पाडण्यासाठी तुम्ही बापजाद्यांना बोलावता, मात्र निष्ठेचा पराभव तुमचे भाडोत्री माणसे करू शकत नाहीत. वनगा हा वणवा आहे, तुम्ही त्यांना साधे उमेदवारी देऊ शकले नाही, गावित जिंकले तर वनगा याना  श्रद्धांजली आणि त्यांचा मुलगा जिंकला तर त्यांना काय दुःख होईल का? मी त्यांच्या अश्रुंना न्याय मागायला आलोय. श्रीनिवास खासदार होणार म्हणजे सामान्य आदिवासी माणूस खासदार होणार…साधा माणूस म्हणूंन तो निवडून येईल …वनगा  कुटुंबाच्या अश्रुना न्याय मिळेल याची मला खात्री आहे

आमच्या कृष्ण घोडा यांच्या मृत्यूनंतर मी लगेच अमित ला बोलावले आणि विचरले तुम्ही का नाही तसे केले, आम्ही गिरकर ताई भाजपच्या नगरसेविका होत्या त्याच्या दुःखद निधनानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मदत केली, पतंगराव कदम यांचे निधन झाले आम्ही विश्वजित ला पाठिंबा दिला, मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून आम्हाला शिकायची गरज नाही

देशाचे पंतप्रधान सारखे विदेशात असतात आणि मेरा देश बदल राहा है… कारण हे सतत विदेशात केवळ निवडणुकी पुरते येतात, निवडणूक झाली कि लगेच विदेशात पाळतात बरोबर रोज देश बदलणारच.

आमच्यावर बेछूट आरोप करण्यापेक्षा एकदा समोर समोर या माझी तयारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे हे लक्षात ठेवा, तुमच्या सारखे आम्ही त्यांना केवळ निवडणुकीसाठी वंदन करत नाही.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *