Sunday, December 16, 2018
Home > इतर बातम्या > पालघर आणि बोईसरला चांगले सरकारी हॉस्पिटल का नाही ?

पालघर आणि बोईसरला चांगले सरकारी हॉस्पिटल का नाही ?

पालघर जिल्हा घोषित होऊन ऑगस्ट महिन्यामध्ये ४ वर्षे पूर्ण होत आहेत. २,९९०,११६ एवढी लोकसंख्या असतानाही एकही बर्न आणि कॅन्सर हॉस्पिटल नाही. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर हि बाब प्राकर्षाने जाणवली. याबाबत सोशल मिडीयावर काही जागरूक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. त्यातील काही प्रतिक्रिया खाली देत आहोत. ह्या प्रतिक्रियेनंतर तरी प्रशासन जागे होऊन आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलेल अशी आशा बाळगून आहेत.

अॅक्सिडेंत केसेस आणि इमर्जन्सीसाठी मुंबई किंवा ठाण्याला जावे लागते, यामुळे अनेकवेळा दुर्देवी नागरिकांचे बळी जातात ठाण्याचे हॉस्पिटल अजिबात स्वच्छ नाही आणि लोकांची तोबा गर्दी असते. बर्न्स युनिट आणि सायकियाट्रिक युनिटची पालघर जिल्ह्यामध्ये सक्त गरज आहे. लोकप्रतिनिधी आणि कलेक्टर ऑफिस नक्की काय करत आहे जर शाळा आणि दवाखान्यासारख्या मूलभूत सोयी नागरिकांना पुरवी शकत नाही आणि ते पण जिल्ह्याच्या ठिकाणी???

– पल्लवी संखे

हि वस्तू स्थिती आहे आणि याला कारणीभूत येथील लोकप्रतिनिधी. येथे अणुशक्ती केंद्र त्याचबरोबर BARC सारखे उपक्रम असूनही एकही कॅन्सर हॉस्पिटल तसेच येथील सामान्य नागरिकांना रेडीयेषणचा किती डोस मिळतोय हे तपासणारी यंत्रणा नाही. बोईसर TAPS येथे हॉस्पिटल आहे परंतु ते फक्त TAPS आणि BARC च्या कामगारांसाठी आणि असे भले मोठे प्रकल्प येथील भूमिपुत्रांच्या जमिनीवर घेऊन येथीलच भूमिपुत्र अश्या प्रकल्पापासून कर्करोग ग्रस्त होत आहे त्याची कोणालाही फिकीर नाही. त्याच्या तोडीला तारापूर MIDC म्हणजे प्रदुषणाचे आगर मग ते हवेतील असो नाहीतर पाण्यातील? कोणाला फिकीर त्याची आता आपण MIDC मध्ये खंडणी वसूल करून पैसे कमवू अथवा कंपनीतला घटक कचरा डोंगरात, जमिनीच्या पोटात बोरवेलच्या होलातून पातळ करून जमिनीच्या पोटात सोडून देऊ या मुले पैसे तर भेटताच आणि प्रदूषण महामंडळ म्हणजे नावाला असलेली संस्था तुम्ही खा आम्ही पण खातो अश्या परिस्थितीतून येथील कामगारांचे होणारे शोषण त्याच बरोबर अपघात झाला की स्थानिक राजकीय अथवा गुंड प्रवृतींच्या लोकांचीच चंगळ आणि एवढी मोठी MIDC असूनही एकही मोठे हॉस्पिटल अथवा ट्रामा हॉस्पिटल नाही. असलेले छोटेछोटे हॉस्पिटलमध्ये साधी प्रथमोपचारही करू न शकलेले अशी परिस्थिती बोईसर आणि तारापूर परिसराची आहे. मोठे अपघात अथवा हार्ट अटॅक आलातरी १२० किलोमीटर दूर पेशंटला घेऊन जावे लागते. या सर्व प्रकाराला येथील जन आणि राजकीय प्रतिनिधी जबाबदार आहेत आणि तेवढीच झोपलेली जनताही जवाबदार आहे. त्याचमुळे येथे पालघर आणि बोईसरला चांगले आणि मोठे सर्व सोयीने परिपूर्ण शासकीय हॉस्पिटल नाही. तुमच्याकडे ३ तासात जगण्याची आशा असेल आणि तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही वाचू शकतात अन्यथा ३ तासात तुम्हाला उपचार मिळून तुम्ही जगू शकत असाल आणि तुमच्याकडे जरी अमाप पैसा असेल तरी तुम्ही जगू शकत नाही हीच वस्तू स्थिती बोईसर – तारापूर परिसरातील जनतेची आहे आणि ती अशीच राहणार कारण जनतेत आवाज नाही.

– बिधानचंद्र पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *