Sunday, December 16, 2018
Home > अजब - गजब > कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे इंजीनविना धावली प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस

कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे इंजीनविना धावली प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस

ओडीशाच्या तितलागढ़ रेलवे जंक्शनवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बेजबादारपणामुळे प्रवाशांनी भरलेली  अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस १० किलोमीटर इंजीनविनाच धावल्याची धक्कादायक घटना शनिवार रात्री १० वाजता घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेसचला संबलपुर रेल्वे डिविजनच्या तितलागढ रेल्वे स्थानकावर एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे इंजीन बसविण्याची प्रकिया होत होती. परंतु यादरम्यान एक्स्प्रेसच्या डब्ब्यांना ब्रेक लावला जातो, रेल्वे कर्मचारी नेमका ब्रेक लावणे विसरले आणि त्यामुळे प्रवाशांनी भरलेली अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस तब्बल १० किलोमीटर इंजीन सोडून धावू लागली. दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांनी ही ट्रेन थांबविली आहे. आणि बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून रेल्वेने दोन कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. तसेच सदर प्रकरणाची संभलपुर डीआरएम ने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *