
मध्यप्रदेशातील महुत जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मी आपल्याला माझं उदाहरण देतो, माझ्या आज्जीवर ३२ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, माझ्या वडिलांना बॉम्बनं उडवून देण्यात आलं होतं. माझ्याविरोधातही हिंसा केली गेली. परंतु ज्या दिवशी माझ्या मनातून भीती गेली तेव्हापासून माझ्या मनात केवळ प्रेम उरलेलं आहे. मी पीएम मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढतो, परंतु माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणताही द्वेष नसल्याचं राहुल गांधी भरसभेत म्हणाले.