
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आफताबची पहिली रात्र दिल्लीच्या तिहार तुरुंगात गेली. आफताब याला जेल क्रमांक 4 मधील त्याच्या सेलमध्ये आणण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आफताब याने तिहार जेलच्या नियमावलीनुसार साधे जेवण खाल्ले. आफताब रात्रभर घोंगडी पांघरुन शांत झोपला. यादरम्यान त्याच्यावर सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण वेळ नजर ठेवण्यात आली होती.
विशेष म्हणजे सोमवारी आफताबची नार्को चाचणी होऊ शकते. श्रद्धा हत्याकांडातील संपूर्ण सत्य नार्को टेस्टमध्ये बाहेर येण्याची अपेक्षा आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यापूर्वी तो पोलीस कोठडीत होता.