
थंडीच्या वातावरणात गीझर चालू असल्यामुळे अनेक वेळी वीज बिल हे जास्त आल्याने आपल्याला मनस्ताप होतो. या विद्युत उपकरणांव्यतिरिक्त, दररोज अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपण वापरतो ज्यामुळे वीज बिल जास्त येतं. जर तुम्हीही जास्त वीजबिलामुळे त्रस्त असाल, तर लगेचच केंद्र सरकारच्या सौर रुफटॉप योजनेचा लाभ घ्या आणि बीज बिलापासून मुक्त व्हा.
देशात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून सौर रूफटॉप योजना चालवली जात आहे. डिस्कॉम्समध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही विक्रेत्यांकडून कोणीही त्याच्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावू शकतो. सौर पॅनेल योजनेंतर्गत जर तुम्ही डिस्कॉममध्ये सामील असलेल्या विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित केले तर ते 5 वर्षांसाठी रूफटॉप सोलरच्या देखभालीची जबाबदारी कंपनी घेते.
सबसिडीचा फायदा घेऊन घरपोच सोलर पॅनल बसवल्यास आपल्या गरजेनुसार सहज वीज निर्मिती करता येईल. यासाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून चांगली सबसिडीही देखील मिळेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी https://solarrooftop.gov.in/ या वेबसाइटवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर Apply for Solar Rooftop वर जा. येथे गेल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे आपल्या राज्यानुसार लिंक निवडा. यानंतर फॉर्म उघडेल, ज्यामध्ये सर्व तपशील भरा. सौर पॅनेल बसवल्यानंतर 30 दिवसांच्या आत डिस्कॉमद्वारे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते.
घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सौर पॅनेलद्वारे वीजनिर्मिती करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला घरात चालणाऱ्या विद्युत उपकरणांची यादी तयार करावी लागेल. साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात 2-3 पंखे, 1 फ्रीज, 6-8 एलईडी दिवे, 1 पाण्याची मोटर आणि टीव्ही, कुलर, प्रेस अशी उपकरणे आपण चालवतो. अशा स्थितीत दररोज 6 ते 8 युनिट विजेची गरज भासतं. 6 ते 8 युनिट्सच्या दैनंदिन उत्पादनासाठी तुमच्या घराच्या छतावर 2 किलोवॅट सौर पॅनेल बसवता येईल.
बाजारात वेगवेगळ्या तंत्रज्ञानासह सोलर पॅनल्स उपलब्ध आहेत. मोनो PERC बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्या नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहे. हे पॅनेल हे समोरून आणि मागून दोन्हीकडून वीज निर्माण करते आणि कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे.
सौर पॅनेल बसविण्यासाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान दिले जाते. तुम्ही 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर रुफटॉप पॅनल बसवल्यास केंद्र सरकार 40 टक्क्यांपर्यंत सबसिडी देते. तसेच जर तुम्ही 10 किलोवॅटपर्यंतचे सौर पॅनेल लावले तर तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळेल.
जर तुम्ही छतावर 2 किलोवॅटचे सौर पॅनेल लावत असाल तर त्यासाठी सुमारे 1 लाख 20 लाख रुपये खर्च येईल. यामध्ये 40 टक्के सबसिडी मिळाल्यास हा खर्च 72 हजार रुपयांपर्यंत कमी होईल. केंद्र सरकारकडून तुम्हाला 48 हजार रुपये सबसिडी मिळेल. सोलर पॅनेल सुमारे 25 वर्षे सेवा देतात. एकदा सोलर पॅनल लावले तर सुमारे 25 वर्षे वीजबिल भरण्याचे टेन्शन तुम्हाला राहणार नाही.