जंगलात शरीर संबंध ठेवायला लावले, मग फेविक्वीक टाकून संपवले; आता मांत्रिक पोलिसांना म्हणतो…
मजावद गावाजवळ असलेल्या जंगलात एका पुरुष आणि महिलेचा मृतदेह आढळून आला होता. दोघांच्या शरीरावर जखमा होत्या. त्यांच्या गुप्तांगावरदेखील जखमा होत्या. पोलिसांनी दोघांची ओळख पटवली. राहुल मीणा आणि सोनू कुंवर अशी दोघांची नावं होती. पोलिसांनी तपास सुरू केला. राहुल आणि सोनू दोघेही विवाहित असल्याची माहिती पुढे आली. दोघांचे विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणाचे धागेदोरे तंत्रमंत्राशी संबंधित असल्याचं पोलिसांना समजलं.प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी दोनशेहून अधिक जणांची चौकशी केली. पन्नासहून अधिक सीसीटीव्ही तपासले. यानंतर पोलिसांनी ५२ वर्षांच्या भालेश कुमारला अटक केली. आपण गेल्या आठ वर्षांपासून भादवी गुडा येथील शेषनाग भावजी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या समस्या दूर करण्यासाठी तावीज तयार करून देत असल्याचं भालेशनं पोलिसांना सांगितलं. सोनू कुवर आणि राहुल मीणा यांच्या कुटुंबीयांची मंदिरात ये-जा असायची. त्यामुळेच राहुल आणि सोनूची जवळीक वाढल्याची माहिती भालेशनं पोलिसांना दिली.

राहुल विवाहित होता. त्याचे पत्नीशी वारंवार वाद व्हायचे. त्यासाठी ती भालेशकडे गेली होती. भालेशनं याच संधीचा फायदा घेत राहुलच्या पत्नी त्याच्या अवैध संबंधांबद्दल सांगितलं. यानंतर भालेशनं सोनूशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल राहुलला समजलं. राहुल आणि सोनू मांत्रिकाकडे गेले आणि त्याला बदनाम करण्याची धमकी देऊ लागले. भाविकांच्या मनातील आपली प्रतिमा मलीन होईल अशी भीती भालेशला होती. त्यामुळे त्यानं दोघांची हत्या केली.

मांत्रिक भावेशनं दोघांची हत्या करण्यासाठी फेविक्वीकची ५० पॅकेट्स खरेदी केली. या पॅकेट्समधील फेविक्वीक त्यानं एका बाटलीत भरलं. राहुल आणि सोनूला भालेशनं १५ नोव्हेंबरला संध्याकाळी बहाण्यानं बोलावलं. भालेश दोघांना घेऊन गोगुंदा परिसरातील जंगलात घेऊन गेला. भालेशनं राहुल आणि सोनूला कपडे उतरवून शरीर संबंध प्रस्थापित करण्यास सांगितलं. यावेळी भालेश काही वेळासाठी तिथून दूर गेला. थोड्या वेळानं भालेशनं दोघांच्या अंगावर फेविक्वीक टाकलं. त्यामुळे राहुल आणि सोनू एकमेकांना चिकटले. यानंतर भालेशनं दोघांवर चाकू आणि दगडांनी हल्ला केला. त्यांच्या गुप्तांगावरदेखील वार केले. यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेत टाकून निघून गेला. थोड्या वेळानं दोघांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *