… तर उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा करावा लागेल – चित्रा वाघ

श्रध्दा वालकर हत्या प्रकरण लव्ह जिहाद नाही. मात्र राज्यात अल्पवयीन मुलींना फूस लावून, त्यांचे धर्मातरण करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे उत्तरप्रदेशाप्रमाणे राज्यातही लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी वसई दौऱ्यावर असताना केली आहे.

चित्रा वाघ यांनी नुकतीच भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या सध्या विविध भागाचा दौरा करत असून मंगळवारी त्यांनी वसईत भेट दिली. यावेळी श्रध्दा वालकर हत्या प्रकऱणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रध्दा वालकरचा मारेकरी आफताबला फाशी देण्याची मागणी केली.

श्रध्दा वालकरचे प्रकरण लव्ह जिहाद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रध्दा वालकर ही सज्ञान होती. तिच्या प्रेमाचा विश्वासघात झाल्याचे त्या म्हणाल्या. परंतु राज्यात अनेक अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांचे धर्मांतरण केले जात आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशाच्या धर्तीवर राज्यात लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *