
दिल्लीच्या चांदणी चौकातील भगीरथ पॅलेस मार्केट इमारतीला लागलेली आग अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. अग्निशमन दलाचे ४० बंब घटनास्थळी पोहोचले असून अग्निशमन जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवानं आगीत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आगीत इमारतीचे दोन मजले भस्मसात झाले आहेत. आगीचं कारण कळू शकलेलं नाही.