
आरोपी अनिल दुबे न्यायालयाच्या आवारातून फरार झाल्याप्रकरणी शशिकांत धुरे या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँक दरोडय़ातील आरोपी अनिल दुबे हा शुक्रवारी पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. त्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे.