
ओवेसी यांनी शहा यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘२००२ मध्ये धडा शिकवल्याचं तुम्ही जे म्हणता तो धडा कोणता होता ते आता लोकांना कळलं आहे. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडून देण्याचा… बिल्किस बानोच्या तीन वर्षांच्या मुलीच्या खुन्यांना सोडून देण्याचा… अहसान जाफरी यांना मारून टाकण्याचा… बेस्ट बेकरी कांड… असं बरंच काही होतं. यापैकी कुठला कुठला धडा आम्ही लक्षात ठेवायचा? असा सवाल ओवेसी यांनी केला.
‘धडा शिकवण्यात मोठेपण नाही. शांतता, सौहार्द तेव्हाच टिकतो जेव्हा पीडितांना न्याय मिळतो. पण सत्ता मिळाल्यानंतर लोक विसरून जातात. सत्तेच्या नशेत बोलतात. देशाचे गृहमंत्री धडा शिकवल्याच्या बाता मारत आहेत. कसला धडा शिकवला. संपूर्ण देशात तुमची बदनामी झाली, असं ओवेसी म्हणाले. ‘सत्ता कधीच, कोणाची कायम राहत नसते हे देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवावं,’ असा इशारा ओवेसी यांनी दिला.