नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. माळटेकडी परिसरातील एका तरुणाचे त्याच्या घरासमोरील महिलेशी प्रेम संबंध होते. दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने या तरुणाची हत्या केली होती. स्वप्नील नागेश्वर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या टोळक्याने आधी स्वप्नीलचे अपहरण करून त्याला आणि महिलेला नांदेड शहरातील उर्वशी मंदिराजवळ जागेत नेले. त्याठिकाणी स्वप्नील नागेश्वरला घोळक्याने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सदरचा सर्व घटनाक्रम हा सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला होता.
दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या खुनाच्या गुन्ह्यातील सात आरोपींना अटक केली आहे. सदर घटना ही घरासमोरील महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाची हत्या झाल्याचं पोलिसांचे म्हणणे होते. पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार या सात मारेकऱ्यांपैकी एकही मारेकरी हा सदर महिलेचा नातेवाईक नाही. तू आमच्या समाजातील महिलेशी का बोलत आहेस म्हणून स्वप्नीलची हत्या झाल्याचा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबाने केला आहे.
सदर घटनेत स्वप्नीलचे सदर तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ऑटोतून अपहरण करण्यात आले होते. ज्यात अटकेत असणाऱ्या सात आरोपींपैकी एकही आरोपी सदर महिलेचा नातेवाईक नाही. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली होती. त्यातील सात आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत.
या घटनेत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. द्वारकादास चिखलीकर यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर मुख्य आरोपी शायबाज खान एजाजखान (रा. पक्की चाळ) याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर महंमद सद्दाम महंमद साजीद कुरेशी (रा. मिलगेट), महंमद उसामा म. साजीद कुरेशी (रा. मिलगेट), शेख अयान शेख इमाम (रा. आसरा नगर), सोहेलखान साहेबखान (रा. सुंदरनगर), सय्यद फरहान उर्फत साहील सय्यद मुमताज (रा. मोमीन गल्ली) आणि उबेदरखान युनुसखान (रा. चौफाळा) या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.