
लघर जिल्ह्यात स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना हा अपघात झाला असून या अपघातात ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सीसीटीव्हीत दिसत आहे की, भरधाव येणारी स्कूल व्हॅन आधी रस्त्याच्या शेजारील झाडाला ठोकते आणि त्यानंतर रस्त्यावर पलटी होते. त्यानंतर तातडीने नागरिक मदतीसाठी धाव घेत आहेत.