बिहारमध्ये रेल्वेचं अख्खं इंजिनच पळवलं आणि विकूनही टाकलं
बिहारमध्‍ये चोरट्यांनी रोहतास येथे ५०० टन वजनाचा लोखंडी पूल चोरल्यानंतर चोरट्यांनी आता बोगदा बनवून संपूर्ण रेल्वे इंजिन गायब केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरपूरमधील एका भंगाराच्या दुकानातून जप्त केलेली बॅग रेल्वेच्या इंजिनच्या पार्ट्सने भरलेली होती.

गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी (बेगुसराय जिल्हा) येथील गरहरा यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले होते. वेळोवेळी काही भाग चोरून या टोळीने हे अख्खं इंजिन पळवून नेलं. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन चैकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगाराच्या गोदामाबाबत कळालं. इथून पोलिसांनी इंजिनच्या भागांच्या १३ गोण्या जप्त केल्या.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरायचे आणि बारीक पोत्यात घेऊन जायचे. याबाबत रेल्वे अधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ होते.

पूर्णिया जिल्‍ह्यात चोरांनी एक संपूर्ण विंटेज मीटर गेज वाफेचे इंजिन विकले होते, जे सार्वजनिक प्रदर्शनासाठी स्‍थानिक रेल्वे स्‍टेशनवर ठेवले होते. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की समस्तीपूर विभागाच्या विभागीय यांत्रिक अभियंत्याने जारी केलेल्या बनावट पत्राच्या आधारे एका रेल्वे अभियंत्याने क्लासिक स्टीम इंजिनची विक्री केल्याची माहिती होती.

तर, बिहारच्या ईशान्य अररिया जिल्ह्यातील सीताधार नदीवरील लोखंडी पुलाचे कुलूप एका टोळीने तोडले आहे. पुलाचा इतर महत्त्वाचा भाग गायब झाल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. पोलिसांनी एफआयआर नोंदवली आणि त्याच्या संरक्षणासाठी एक हवालदार नियुक्त करण्यात आला. हा पलटनिया पूल फारबिसगंज शहराला राणीगंजला जोडतो.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. फारबिसगंज पोलीस स्टेशनचे प्रभारी निर्मल कुमार यादवंदू यांनी मीडियाला सांगितले की, आम्ही पुलाच्या सुरक्षेसाठी एक हवालदार तैनात केला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लोखंडी पुलाचा काही भाग चोरल्याप्रकरणी आम्ही अज्ञातामविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *