मराठी मातीतील गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊ यांचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे, उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नांवरुन शिंदे सरकारवर टीका केली. याशिवाय त्यांनी ज्या आमदार आणि खासदारांनी बंड केलं त्यांच्यावर देखील टीका केली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी यवतमाळ आणि वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर देखील टीका केली.

बऱ्याच महिन्यानंतर, वर्षानंतर मी आपल्या दर्शनाला आलो, दसऱ्याच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबई बाहेर सभा घेईन तर ती सभा राजमाता जिजाऊ यांच्या भूमीत सभा घेण्याचा निर्णय घेतला. मराठी मातीतील गद्दारी गाढायची असेल तर जिजाऊ यांचे आशीर्वाद घेणं आवश्यक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. संविधान सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. चार पाच दिवसांपूर्वी मी प्रकाश आंबेडकर एका मंचावर आलो होतो. आपली वाटचाल लोकशाही वाचवण्याच्या दिशेनं पुढं जावं लागेल. काही जण ४० जण घेऊन रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत हे मी म्हटलेलं नाही तर त्यांच्याच एका मंत्र्यानं म्हटलं, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मी शिवतीर्थावर शपथ घेतल्यानंतर मी एकविरा मातेच्या दर्शनाला आणि अयोध्येला गेलो होता. हे गुवाहाटीला गेले आहेत, असाही टोला त्यांनी लगावला.

तुमचं भवितव्य ठरवणारे मायबाप दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ बसलं म्हटलं उठायचं आणि बस म्हटलं बसायचं. बुलढाण्यात आलो की जुने चेहरे दिसत नाहीत. मात्र, ते फसवे निघाले आहेत. हे जे मर्द मावळे इथं जमले आहेत. आमचं सरकार व्यवस्थित चाललं होतं, मात्र त्यांनी सरकार पाडलं. नितीन देशमुख परत आले, आज तिकडे सगळे गेले आहेत. मी शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे. मी त्वेषानं उभा आहे. पुन्हा जिंकणार म्हणजे जिंकणारचं आहे.

नितीन देशमुख, कैलास पाटील, अरविंद सावंत, विनायक राऊत आहेत. आपल्या पलीकडच्या ताई आहेत, आपणचं त्यांना खासदार केलं. इथल्या गद्दारांना आमदार खासदार तुम्ही केलं होतं. इथल्या ताईंना धमक्या देण्यात आल्या. खास मुंबईवरुन दलाल इकडे यायचे. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना अटक झाली. ताई मोठ्या हुशार, त्यांनी जाऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. भैय्या मेरे राखी के बंधन को निभाना आता तो फोटो छापून आणला. आता सीबीआय आणि ईडीवाल्यांची हिंम्मत आहे का ताईंवर कारवाई करायची, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज भाजप भाकड पक्ष झाला आहे, यांच्या पक्षात आयात सुरु आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडून लोकं आयात केली जात आहेत. इथले गद्दार आमदार खासदार आहेत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, असं सांगावं. यांना नाव शिवसेनेचं पाहिजे, बाळासाहेबांचं नाव पाहिजे आणि आशीर्वाद नरेंद्र मोदींचे पाहिजेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

पीक विमा कंपन्यांची मस्ती मोर्चा काढून उतरवली होती. पुन्हा त्यांना मस्ती आली असेल तर ती उतरवू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *