
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच कोकण दौऱ्यावर केला. या दौऱ्यात त्यांनी राणे पिता पुत्रांवर जोरदार आसूड ओढले. अंधारेंनी केलेले शाब्दिक वार राणेंच्या जिव्हारी लागली. काल संधी मिळताच राणेंनी अंधारेंना प्रत्युत्तर दिलं. “माझ्यावर टीका करायला शिवसेनेत आता राहिलंय कोण? म्हणून तिला आणलंय.. शिवसेनेत उभी फूट पडतीये, याचा आनंद आहे. तिला माझ्यावर टीका करायला इथे आणलं, याचा अर्थ शिवसेना संपली ना……” असं राणे म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चित्रा वाघ यांच्या समवेत कणकवलीत राणे यांनी पत्रकार परिषद घेतली.
शिवसेनेचं दुसरं पिल्लू आहे ते कुठल्याही बिळात शिरतंय. बिहारला जातो काय? कोणालाही मिठी मारतो काय…. त्याने कितीही मिठ्या मारल्या तरी सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणात तो सुटणार नाही. कारण आम्हाला वास्तव माहिती आहे. आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.