मुंबई अग्निशमन दलातील भरतीची जाहिरात खोटी; प्रतिसाद न देण्याचे प्रमुख अग्निशमन अधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलामध्ये ‘अग्निशामक’ या संवर्गातील एकूण 774 पदांकरिता सरळसेवा पद्धतीने (Walk In Selection) भरती होणार असल्याची जाहिरात विविध समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

तसेच सदर भरती प्रक्रिया ही 19 ऑगस्ट 2022 ते 2 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये सरळसेवा पद्धतीने होणार असल्याचेही जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. ही जाहिरात व त्यातील माहिती ही खोटी व दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे या जाहिरातीस प्रतिसाद देऊ नये, तसेच नागरिकांनी अशा खोट्या आशयास बळी पडू नये, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी केले आहे.

ही खोटी जाहिरात, माहिती ही केवळ समाज माध्यमांवर प्रसारित होत असून कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशनार्थ देण्यात आलेली नाही, याची देखील कृपया नोंद घ्यावी, ही विनंती, असेही त्यांनी सांगितले. तसेच समाज माध्यमांद्वारे ज्यांना जाहिरात – माहिती मिळाली असेल, त्यांनी ही माहिती कोणालाही ‘फॉरवर्ड’ करु नये. त्याचबरोबर ज्यांनी माहिती पाठविली असेल, त्यांनाही ही जाहिरात खोटी असल्याचे कळवावे, अशीही विनंती या निमित्ताने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *