राज्यपालपदाची प्रतिष्ठा रसातळाला नेली, यांना तत्काळ हटवा – उदयनराजे भोसले
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रातील जनतेच्या आणि नेत्यांच्या मनात रोष वाढतो आहे. त्यांना लवकारत लवकर पदमुक्त करावं, अशी मागणी होऊ लागलेली आहे. काल दिवसभरात अनेक ग्रामपंचायतींनी राज्यपालांना हटविण्याचे ठराव केले, त्यांना पदमुक्त करावं या मागणीसाठी अनेक शहरांनी बंद पुकारलेला असताना छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींना पदावरुन हटवा, अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकीर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याची माळ पाहता त्यांचं आतापर्यंतचं वर्तन अशोभनीय आहे. त्यांना तत्काळ पदमुक्त करा, अशी मागणी करणारं पत्र पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे.छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करील आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.

दि. २० नोव्हेंबर २०१२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे. पण यापुर्वीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते. या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वतः बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकीर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत.

२०१४ साली आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा भव्य असा पायाभरणी समारंभ केलात. इतकंच नाही तर भारतीय नौदालाचा ध्वज शिवरायांना अर्पण केलात. या निर्णयाने लाखो शिवप्रेमी आनंदलेले असताना महाराष्ट्राचे राज्यपाले भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र अशोभनीय वर्तन केले. आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरून दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यावर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *