
मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास पकडण्यात उज्जैन जिल्ह्यातील नागदा पोलिसांना यश आले आहे. मात्र,पोलीस अजूनही त्याला संशयित मानत आहेत. हा आरोपी रायबरेलीचा रहिवासी आहे. गुन्हे शाखेने पाठवलेल्या फोटोवरून नागदा पोलिसांनी त्याला पकडले असून पुढील कारवाईसाठी इंदूर गुन्हे शाखेला कळविण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आल्यावर त्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी संशयित आरोपीने दिली होती.
इंदूर क्राईम ब्रँचने उज्जैन जिल्ह्यातील नागदा पोलिसांना एक फोटो पाठवून राहुल गांधींना धमकी देणाऱ्या आरोपीचा हा चेहरा आहे. या फोटोच्या आधारे नागदा पोलीस गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. गुरूवारी दुपारीदोन वाजण्याच्या सुमारास नागदा येथील बायपासवरील एका हॉटेलमध्ये अशा वर्णनाचा एक व्यक्ती जेवण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या व्यक्तीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. दया सिंग असे संशयित आरोपीने नाव आहे. हा शीख आहे. या व्यक्तीकडे आढळलेल्या आधार कार्डावरील पत्ता रायबरेली,उत्तर प्रदेशचा आहे. वॉर्ड क्रमांक २४ येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.