
बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. होसाकेरेहल्ली परिसरालगत असेलेल्या एका मुलींच्या खासगी वसतीगृहाच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा लाऊन तब्बल १२०० मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ बनवल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने त्याच्या प्रेयसीचा देखील व्हिडिओ देखील बनवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पूर्वी देखील आरोपीने असे कृत्य केले होते. त्यावेळी त्याचा माफीनामा घेऊन सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्याने हे कृत्य पुन्हा केले आहे.