
श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान आफताबची पॉलीग्राफ चाचणी घेण्याचा निर्णयाला एफएसएलच्या संचालक दीपा वर्मा यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचणीतून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान आफताबने कबूल केले आहे की, श्रद्धाच्या हत्येपूर्वी त्याने ‘दृश्यम’ हा बॉलिवूड चित्रपट पाहिला होता, तो पार्ट-2 चीही वाट पाहत होता.
तो हत्येनंतरचे चित्रपटातील काही दृष्ये पाहूनच कथा रचण्याचा प्रयत्न करत होता. आफताबने प्लॅनिंग करून खून केला आणि नंतर श्रद्धाचे मित्र आणि कुटुंबीयांशी बोलून तो पुरावे तयार करायचा. यातून तो निर्दोष मुक्त होऊ शकेल असाच त्याचा डाव होता. या प्लॅनमुळे आफताब सतत श्रद्धाच्या मित्रांशी फोन आणि सोशल मीडियावर बोलत होता. श्रद्धा मला सोडून गेल्याचे वारंवार तो त्यांच्या मनात बिंबवत होता.
Shraddha murder case | Delhi: Polygraph test of the accused Aaftab Amin could not be held today: Sagar Preet Hooda, Special CP (Law & Order), Delhi Police
— ANI (@ANI) November 25, 2022