
मुंबईतील काही हॉटेलांमध्ये कबुतराचे मांस दिले जाते या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका रहिवासी सोसायटीच्या इमारतीच्या छतावर कबुतर पाळली जात होती. त्याची वाढ करून ती गुपचूपपणे हॉटेलांना विकली जात होती. एका निवृत्त आर्मी कॅप्टनने दिलेल्या तक्रारीवरून सायन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
सायन पोलीस ठाणे क्षेत्रातील श्री नरोत्तम निवास को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीतील हे प्रकरण आहे. या सोसायटीत राहणारे निवृत्त आर्मीचे कॅप्टन हरेश गगलानी यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. इमारतीच्या छतावर कबुतप पाळून ती काही हॉटेलांना पुरवली जातात अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे केली होती.
हरेश गगलानी यांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. या तक्रारीनंतर सायन पोलीसांनी आरोपी अभिषेक सावंत आणि त्याला मदत करणाऱ्या सोसायटीच्या इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.