
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय व्यावसायिकाचं एका ३५ वर्षीय गृहिणीशी प्रेमसंबंध होते. १६ नोव्हेंबरला व्यावसायिक प्रेयसीच्या घरी गेला. त्यावेळी शारीरिक संबंध ठेवत असताना त्याला फिट आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा बभ्रा झाल्यास समाजातील प्रतिमा मलीन होईल अशी भीती महिला आणि तिच्या कुटुंबाला होती. त्यामुळे महिलेनं तिच्या भावाला आणि पतीला बोलावलं. त्यांनी व्यावसायिकाचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरला आणि जे. पी. नगरमधील निर्जन स्थळी फेकला.
पोलिसांनी व्यावसायिकाच्या फोन कॉल्सचा तपशील तपासला. तेव्हा तो प्रेयसीच्या घरी गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेची चौकशी केली. यावेळी तिनं झालेला प्रकार सांगितला. नात्याबद्दल कोणालाही समजू नये या हेतूनं मृतदेह निर्जन ठिकाणी टाकल्याची माहिती तिनं दिली.
पोलिसांनी या प्रकरणी व्यावसायिकाच्या कुटुंबियांची चौकशी केली. तेव्हा व्यावसायिक सुनेच्या भेटीसाठी तिच्या घरी जात असल्याचं सांगून निघाल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यावसायिक घरी न परतल्यानं त्यांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. मृत व्यक्तीला आरोग्याच्या अनेक समस्या होत्या आणि ऑगस्टमध्ये त्याची अँटिओग्राम झाल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १७६, २०१ आणि २०२ यांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं केलेले दावे कितपत खरे आहेत याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.