आश्रमशाळेतच विद्यार्थीनीची आत्महत्या

रविंद्र साळवे : विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणारी विध्यार्थीनीनी आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु आहे. शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद कुडाचा पाडा येथील इयत्ता 12 वी मध्ये शिकणारी विध्यार्थीनीने आश्रमशाळेत 12 ते 3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. या बाबत विक्रमगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु असुन अधिक तपास पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते करत असुन. आत्महत्येचे नेमके कारण तपासा नंतर कळू शकेल असे प्रदीप गिते यांनी सांगितले.

मात्र शाळा सुरु होण्याच्या वेळेतच आत्महत्या कशी होते. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे येथील विद्यार्थ्यांवर लक्ष नाही का असा प्रश्न या विद्यार्थीनींच्या पालकांनी उपस्थितीत केला आहे. साखरे येथील शासकीय आश्रम शाळेत या आधी ही अनेक घटना: 2016 मध्ये या आश्रम शाळेत विद्यार्थिनीला ताप येऊन मृत्यू झाला होता. तर अनेक वेळा सर्पदंश व इतर घटना या आश्रम शाळेत घडल्या आहेत. हे आश्रमशाळा नेहमीच चर्चेत असुन. या आश्रम शाळेकडे आदिवासी विकास प्रकल्पकडून नेहमी दुर्लक्ष होत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *