
पुणे परिमंडल अंतर्गत पुणे शहरातील ४७ हजार ५७४ तर पिंपरी चिंचवड शहरातील २६ हजार ११७ तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे तालुके व हवेली तालुक्यामध्ये १५ हजार २३४ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक योजनेत सहभाग घेतला आहे. महावितरणची ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.